Nagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह

संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

0

एमपीसी न्यूज – केंद्रीय परिवहन मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनीही काळजी घ्यावी आणि नियमांचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी ट्विटरवरून केलं आहे.

नितीन गडकरी सध्या विलगीकरणात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी गृहमंत्री अमित शहांसह केंद्रातल्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

‘काल मला अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. माझी प्रकृती आता चांगली आहे. तुमचे आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्यासोबत आहेत. मी सध्या विलगीकरणात आहे,’ असं गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी तसेच नियमांचंही पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

आतापर्यंत मोदी सरकारमधील अनके मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, धर्मेंद्र प्रधान, गजेंद्रसिंग शेखावत, श्रीपाद नाईक आणि सुरेश अंगडी यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.