Nagpur News : सुशांत सिंह केसच्या तपासात काय सापडलं ? सीबीआयनं खुलासा करावा – गृहमंत्री अनिल देशमुख

एमपीसी न्यूज – सुशांत सिंह केसमध्ये सीबीआयला तपास देऊन चार ते पाच महिने झाले. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. सीबीआयनं या केसच्या बाबतीतला तपासाचा अहवाल जनतेसमोर ठेवावा असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटल आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख नागपूर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशमुख म्हणाले, महाराष्ट्रातले लोक तसेच महाराष्ट्राबाहेरचे लोक अतिशय उत्सुकतेनं सीबीआयच्या या तपासाची वाट बघताहेत की कधी एकदा सीबीआयचा तपास समोर येतो. त्यामुळं ही आत्महत्या होती की त्याची हत्या करण्यात आली याबद्दलचं सत्य जनतेसमोर येईल. आज गृहमंत्री म्हणून लोक मला सातत्यानं विचारतात की या केसचं काय झालं. त्यामुळं सीबीआयनं याचा लवकरात लवकर खुलासा करावा.

_MPC_DIR_MPU_II

सुशांत सिंह केसमध्ये सीबीआयला तपास देऊन चार ते पाच महिने झाले. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे सीबीआयनं लवकरात लवकर या केसचा तपास अहवाल जनतेसमोर ठेवावा, असे देशमुख म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.