Pimpri : ऐपतदार दाखला देण्यासाठी सात हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – ऐपतदार दाखला देण्यासाठी सात हजारांची लाच घेताना नायब तहसीलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. 25) करण्यात आली.

विकी मदनसिंग परदेशी (वय 37, रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 33 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकी अपर हवेली तहसीलदार कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे निवासी नायब तहसीलदार आहेत. तक्रारदार यांना ऐपतदार दाखला (सोलव्हनसी सर्टिफिकेट) देण्यासाठी आरोपीने सात हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याप्रकरणी एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार सापळा रचून रंगेहाथ पकडले.

पोलीस अधिकारी सीमा मेहेंदळे, श्रीहरी पाटील, पोलीस कर्मचारी विनोद भोकरे, नंदलाल गायकवाड, मुश्ताक खान, प्रशांत बो-हाडे, अविनाश इंगुळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1