Pune : मेट्रोच्या दोन्ही मार्गांना मराठीत नावे द्या

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील मेट्रोच्या दोन्ही मार्गांना व महाराष्ट्रातील इतर शहरातील मार्गांना महामेट्रो कार्पोरेशनने इंग्रजित नावे दिली. ती रद्द करून मराठीत द्यावी, म्हणून व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना निवेदन देण्यात आले.

दीक्षित यांनी मराठीत नावे देण्यात येणार आहे, असे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. पुणे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

यावेळी तानाजी लोणकर, राजेंद्र शिळीमकर, संजय वाल्हेकर, संजय डोंगरे, रुपेश पवार, आबा निकम, राजेंद्र बाबर, आबा कुंभारकर, बाळासाहेब गरूड, संदीप गायकवाड, चंदन साळुंखे, अभय वाघमारे, अनिल दामजी, उत्तम भुजबळ, सनी गवते, अभिजित शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.