Deepika’s name in chat – ड्रगप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव समोर

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अनेक गोष्टींचा अजून उलगडा झाला नाही. पण त्यातील एका मुद्द्याच्या अनुषंगाने तपास सुरु असताना अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. चित्रपटसृष्टीचे ड्रग कनेक्शन यामुळे उघडकीस येत आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर तिने ड्रग घेत असल्याचे कबूल केले आहे.

आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)ने अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला समन्स पाठवले आहे. त्यांची याच आठवड्यात चौकशी होऊ शकते. ड्रग्ज प्रकरणात रकुल प्रीत सिंह व सिमोन खंबाटा यांनाही बोलावले जाऊ शकते.

_MPC_DIR_MPU_II

एनसीबी सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांच्या वृत्तांत म्हटले आहे की, अभिनेत्री दीपिका पदुकोणलाही समन्स बजावले जाऊ शकते. ड्रग्जशी संबंधित व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये तिचे नाव समोर आले आहे. एनसीबीने सोमवारी सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी व टॅलेंट मॅनेजर जया साहाची 5 तास चौकशी केली.

या संबंधित मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्जबाबत 28 ऑक्टोबर 2017 च्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये दीपिका पदुकोणचे नाव आले आहे. यात ‘डी’ हा कोडवर्ड दीपिकासाठी असल्याचे सांगितले जाते. एका चॅनलच्या दाव्यानुसार, चॅटमध्ये दीपिका ‘के’ला ‘माल’बाबत विचारते. ती उत्तरते, हे तिच्याकडे आहे, मात्र घरी ठेवलेले आहे. नंतर ‘के’ म्हणते की ती तिला काय हवं आहे ती ‘अमित’ला विचारू शकते. दीपिका स्पष्ट करते की तिला ‘हॅश’ हवे आहे, ‘वीड’ नव्हे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.