BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : प्राधिकरणातील सावली हॉटेल चौकाचे अग्रसेन महाराज चौक नामकरण

एमपीसी न्यूज –  निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २४ मधील सावली हॉटेल चौकाचे बुधवारी ‘श्री अग्रसेन महाराज चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे.

यावेळी नगरसेविका शैलजा मोरे, राजेंद्र बाबर, अग्रसेन महाराज ट्रस्टचे अध्यक्ष भीमसेन अग्रवाल, कार्याध्यक्ष प्रेमचंद मित्तल, सचिव रमेश गोयल, विनोद बन्सल, सकपाल मित्तल, सुनील अग्रवाल यांच्यासह ट्रस्टचे कार्यकारिणी सदस्य आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शर्मिला बाबर म्हणाल्या की, “अग्रवाल समाजाचे सामाजिक योगदान खूप मोठे आहे. चौकाच्या नामकरणाच्या निमित्ताने त्याचे दीर्घकालीन स्मरण होत राहील”. पिंपरी-चिंचवड महापालिका अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर यांच्या हस्ते नामकरण कोनशिलेचे अनावरण करण्यात आले आहे .

 

Advertisement

HB_POST_END_FTR-A3