Pimpri : पिंपरी चिंचवडचे नाव शिक्षण क्षेत्रामध्ये अभिमानाने घेतले जाते – ज्ञानेश्वर लांडगे

स्व. माजी खा. शंकरराव पाटील यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक स्व. माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांच्या दूरदुष्टीकोनातून स्थापन झालेल्या या शिक्षण संस्थेतून मागील सत्तावीस वर्षांत हजारों अभियंते परदेशात व देशात उद्योग व्यवसायात स्थिरस्थावर झाले आहेत. देशाच्या विकासात महत्वपुर्ण भूमिका पार पाडीत आहेत. शंकरराव पाटील यांनी पीसीईटीच्या विकासासाठी केलेल्या कार्यामुळेच आज पिंपरी चिंचवड शहराचे नाव उद्योग व्यवसायाबरोबच शिक्षण क्षेत्रामध्ये देखील अभिमानाने घेतले जाते.

प्राथमिक शिक्षण ते अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण एकाच संकुलात मिळावे हे त्यांचे स्वप्न होते. आकुर्डी व रावेत येथील संकुलात असे शिक्षण पीसीईटीने उपलब्ध करुन दिले आहे. अशी माहिती पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिली. स्व. माजी खा. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त आकुर्डी संकुलात पाटील यांच्या प्रतिमेस लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर, प्राचार्य डॉ. हरीष तिवारी, डॉ. डॅनियल पेनकर, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, प्राचार्या डॉ. व्हि.एस. बॅकोड, प्रबंधक प्रा. योगेश भावसार, रेक्टर एस. आर. कासार, प्रशासन अधिकारी सुभाष कानेटकर आदींसह प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी सांगितले की, पीसीईटीचा आकुर्डी, रावेत येथे सात शाखांमध्ये विस्तार झाला आहे. एक हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग दहा हजार विद्यार्थ्यांना येथे मार्गदर्शन करीत आहेत. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, तंत्र शिक्षण पदवी, पदवीका, पदव्युत्तर, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, अभियांत्रिकीच्या विविध शाखांव्दारे विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले जात आहे. महाराष्ट्र शासन, पुणे विद्यापीठ, एआयसीटी, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, राष्ट्रीय मुल्यांकन बोर्ड (नॅक) या संस्थांची पीसीईटीच्या विविध शाखांना मान्यता आहे असे देसाई यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.