Pune : ‘अझर गोट्या इलेव्हन’ ने कोरले ‘स्वच्छता करंडक’वर नाव

माय अर्थ फाउंडेशन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण जनजागृतीसाठी आयोजन 

एमपीसी न्यूज – अझर गोट्या इलेव्हन या संघाने यंदाच्या वर्षीचा ‘स्वच्छता करंडक’ जिंकला आहे. तर सुरज दादा निंबाळकर हा संघ द्वितीय स्थानावर आहे. जय गणेश इलेव्हन संघाने तृतीय क्रमांक पटकावला. मॅन ऑफ द मॅच पप्पु रामगुडे, सर्वोत्तम गोलंदाज अजय आवळे, सर्वोत्तम फलंदाज तुषार रणदिवे यांनी बाजी मारली. पुणेकरांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी नागरिकांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती करण्याच्या उद्देशाने माय अर्थ फांउडेशन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता करंडक’चे आयोजन करण्यात आले होते.

तळजाई येथील सदू स्टेडियम येथे हा करंडक पार पडला असून या उपक्रमात पुणे शहरातून ४० क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला होता. पुणेकरांना स्वच्छतेचे महत्व कळावे म्हणून या स्पर्धेद्वारे जनजागृती करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती हे या उपक्रमाचे ध्येय होते.

‘स्वच्छता करंडक’ समारोपप्रसंगी पुणे मनपासह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे भालचंद्र जगताप, नॅशनल सॉलिड वेस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे नितीन देशपांडे, पराग मते, ललित राठी, नितीन कदम, राहुल माने, अनिल छाजेड, मनीष जगदाळे, किशोर रजपूत, स्वप्नील नाईक, हरीश चांदवानी, श्री घालससी, विकास पाटील, प्रसाद चावरे, श्रीकांत मेमाणे, हरीश खर्डेकर किशोर कांबळे, उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन प्रकाश चव्हाण, महेश चरवड, मनीष घरत यांनी केले तर आयोजन माय अर्थचे अध्यक्ष अनंत घरत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.