Charholi : च-होलीतील चौकाचे श्रीमंत सुभेदार कृष्णाजी दाभाडे चौक असे नामकरण

एमपीसी न्यूज – च-होलीतील चौकाचे श्रीमंत सुभेदार  कृष्णाजी दाभाडे चौक असे नामकरण करण्यात आले आहे. दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाने च-होली गावचा इतिहास उज्वल केला आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांचे नाव च-होली येथील चौकाला देण्यात आले आहे.  

सचिन पंडितराव दाभाडे यांच्या हस्ते आज (शनिवारी) चौकाचे नामकरण करण्यात आले आहे. यावेळी बाळासाहेब दाभाडे, सागर दाभाडे, अक्षय दाभाडे,  शुभम दाभाडे, सुरज दाभाडे, रोहन दाभाडे, विशाल दाभाडे यावेळी उपस्थित होते.

भोसरी आळंदी रस्त्यावर सुमारे 25 किलोमीटर अंतरावर च-होली बुद्रुक हे ऐतिहासिक गाव आहे. च-होली हे जुन्या बाजारपेठेचे गाव असून येथील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती आहे. येथे भाजीपाल्याचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते. या च-होली बुद्रुक येथे दाभाडे घराण्यातील कृष्णाजी दाभाडे यांच्या कारकिर्दीत च-होली गावाची भरभराट झाली होती.   वाडे, मंदिरे ही कामे पूर्ण झाली.

श्रीमंत सुभेदार  कृष्णाजी दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाने च-होली गावचा इतिहास उज्वल केला आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान होण्यासाठी त्यांच नाव च-होली येथील चौकाला देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.