Pune : नमो ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते पदी विकास रासकर

एमपीसी न्यूज – विकास रासकर यांची नमो ग्रुप फाउंडेशन, महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नमो ग्रुप फाउंडेशनचे मार्गदर्शक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ज्येष्ठ बंधू सोमाभाई दामोदर मोदी यांनी रासकर यांची नियुक्ती केली. 

सोमाभाई मोदी यांनी विकास रासकर यांना नमो ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष महर्षी देसाई यांच्या उपस्थितीत नियुक्तीचे पत्र दिले. विकास रासकर यांचे भाजप पक्ष संघटन मजबुतीकरणासह पक्ष बांधणीत मोठे काम आहे. तसेच भाजपा, ओबेसी मोर्चाचे रासकर उपाध्यक्ष आहेत. त्यांचे कार्य पाहून सोमाभाई मोदी यांनी रासकर यांची नमो ग्रुप फाउंडेशन, महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे.
यावेळी नमो ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष महर्षी देसाई, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद परदेशी, महाराष्ट्र महासचिव सुधाकर राजे, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष सागर कहाणे, प्रदेश महामंत्री नितीन पाटील आदी उपस्थित होते.

प्रवक्ते पदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल नमो ग्रुप फाऊंडेशन, सोमाभाई मोदी यांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीन, असे रासकर यांनी सांगितले. नमो ग्रुप फाउंडेशनचे काम स्थानिक पातळीवर अधिक चांगले करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत पोहचविणार आहे, असे त्यांनी सांगितले.

नमो ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सोमाभाई मोदी यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे, असेही रासकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.