Pimpri news: वायसीएम रूग्णालयात रूग्णांसाठी ‘नमो थाळी’; उपमहापौर तुषार हिंगे यांचा सेवाभावी उपक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात शहरासह जिल्हा व राज्यभरातून शेकडो रूग्ण उपचारासाठी दाखल होता. शहरातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी 20 रूपये नाममात्र दरात ‘नमो थाळी’चा स्टॉल सुरू करण्यात आला आहे.

त्यामुळे रूग्णालयातील विशेषत: शहराबाहेरील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची सोय झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या अनोख्या व सेवाभावी उपक्रमाची सुरूवात गुरूवारी (दि.17) करण्यात आली. उपक्रमाचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर व मुख्य संयोजक तुषार हिंगे, नगरसेवक शीतल शिंदे, अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे तसेच, अमित गोरखे, रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, पदाधिकारी  आदी उपस्थित होते.

या संदर्भात उपमहापौर व या उपक्रमाचे संयोजक तुषार हिंगे यांनी सांगितले की, दररोज दुपारी व सायंकाळी असे दोन वेळेला सकस जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. या नमो थाळीचा दर 20 रूपये असा नाममात्र आहे. त्यामुळे ती सर्वसामान्य रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना परवडणारी आहे. विशेषत: शहराबाहेरील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना या उपक्रमांचा अधिक लाभ होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.