Pimple Saudagar : राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांचा वाढदिवस चिंचवड विधानसभेत विविध उपक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभेत विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने रक्तदान शिबीर,आरोग्य शिबीर,मॅरेथान स्पर्धा व स्केटिंग  अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे ३०० आबालवृद्धांनी तर स्केटिंगमध्ये ७५० मुलांनी  सहभाग घेतला होता. तर सुमारे एक हजार विविध प्रकारच्या रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पिंपळे सौदागर येथील महापालिकेच्या माध्यमिक  व प्राथमिक शाळेत  तसेच परिसरातील सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त नाना काटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नाना काटे सोशल फोंडेशन व  फिट अँड जॉय ग्रुप यांच्या वतीने मॅरेथान स्पर्धा घेण्यात आली . सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व अतिक्रमण होत असल्याने त्यावर कुठेतरी या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी हि स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत पिंपळे सौदागर परिसरातील विविध सोसायटी मधील सर्वच वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला यात लहान मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात २१५ रक्तदात्यांनी रक्तदान केले जिल्हा उरो रुग्णालय औंध व तालेरा रुणालय चिंचवड  यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे संयोजन करण्यात आले होते. तसेच वाकड,पिंपळे गुरव,रहाटणी व थेरगाव परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात रक्तदाब,मधुमेह,दंतचिकित्सा,डोळे तपासणी,अस्थिरोग यासह व विविध आजाराची तपासणी करण्यात आली,सदरील आरोग्य शिबिराचे आयोजन विशाल वाकडकर,सुनील गव्हाणे,प्रभाकर ववले ,गोरक्षनाथ पाषाणाकर,देवीदास नखाते,सागर कोकणे,कुणाल थोपटे,राजेंद्र जगताप,शाम जगताप,तानाजी जवळकर ,अमरसिंग अदियाल यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच यानिमित्ताने वाकड येथी कुलस्वामिनी महिला बचत गट स्थापन करण्यात आला तर मोफत दुचाकी पीयूसी तपासणी करण्यात आली याचा लाभ परिसरातील अनेक दुचाकीस्वारांनी घेतला

यावेळी खासदार श्रीरंग बारणे,आमदार महेश लांडगे,गौतम चाबुकस्वार ,राष्टवादी युवक कांग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील ,राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर,विराधीपक्षनेते दत्ता साने,शिवसेना गटनेते राहुल कलाटे,हनुमंत गावडे,,भाऊसाहेब भोईर,कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक मयूर कलाटे,तुषार कामठे, संतोष कोकणे, उषा काळे सुलक्षणा शिलवंत, प्रज्ञा खानोलकर,विक्रांत लांडे,प्रभाकर वाघेरे,निलेश डोके,विलास पाडाळे ,गणेश भोंडवे,राजेंद्र साळुंखे,राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, मनोहर पवार, शरद बो-हाडे , कैलास थोपटे ,खंडू कोकणे, शाम जगताप, संदीप कस्पटे,निलेश पांढरकर,मुरलीधर ढगे,भारत केसरी विजय गावडे,अमोल बराटे यांच्यासह परिसरातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक  मान्यवर व शहारातील नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like