Pimple Saudagar News : पाण्याची समस्या सोडवली नाही तर आंदोलन करण्याचा नाना काटे यांचा इशारा

एमपीसी न्यूज : गेल्या काही दिवसांपासून पिंपळे सौदागर मधील प्रभाग क्रमांक 28 येथे कमी पाण्याची समस्या आहे. प्रभागातील अनेक सोसायट्यांमध्ये कमी प्रमाणात व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. आयुक्तांनी ही पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवावी, अन्यथा सोसायटीमधील नागरिकांना एकत्र घेऊन रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नाना काटे व शीतल काटे यांनी दिला आहे.

नाना काटे व शीतल काटे पुरेसे पाणी मिळवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करत आहेत. पण महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता अजय सुर्यवंशी यांना सतत तक्रारी देऊन सुद्धा दरवेळेस फिडर प्रोब्लेम, पाईप लाईन फुटली, लाईट गेली असे उत्तर देउन पाण्याच्या प्रश्नाकडे ते दुर्लक्ष करत आहेत.

प्रभाग कंमांक 28 मधील कुणाल आयकॉन, जिंजर, ओरोवेट, ब्लुवुडस, रोझवुड, समृद्धी पार्क, रोझ व्हॅली, द्वारका लॉर्ड, रॉयल ईम्पेरीयो, मन मंदिर, द क्रिस्ट, पुर्वा रेसीडेन्सी, फ्लोरा रेसीडेन्सी आदी सोसायट्यांमध्ये कमी पाण्याची समस्या उद्भवली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.