Nana Patole Tested Positive : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाचा संसर्ग

नाना पटोले यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

एमपीसी न्यूज – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. नाना पटोले यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

‘गेले अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे. त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले.

यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली. ती चाचणी सकारात्मक आली आहे. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये’, असं नाना पटोले म्हणाले.

गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच करोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन, असंही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.