Pune : नांदेड सिटीतील डेस्टिनेशन मॉलच्या मसाज सेंटरमधील सेक्स रॅकेट उघडकीस; चार तरुणींची सुटका

एमपीसी न्यूज – नांदेड सिटीतील डेस्टिनेशन मॉलमधील मसाज सेंटरवर काल शुक्रवारी (दि.12) छापा टाकून सेक्स रॅकेट उघडकीस आणून 4 तरुणींची सुटका करण्यात आली.

याप्रकरणी मसाज सेंटरचा मालक शरद नामदेव जाधव व व्यवस्थापक टी. मावेलझुआ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना खबऱ्याकडून नांदेड सिटीमधील डेस्टिनेशन मॉलच्या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालवला जातो अशी माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या मसाज सेंटरवर सापळा रचून छापा घातला व प्रकार उघडकीस आणला.

यावेळी पोलिसांनी वेश्या व्यवसायासाठी परदेशातून आणलेल्या 3 तरुणी व परराज्यातील एक अशा एकूण चार तरुणींची सुटका करण्यात आली व तेथील व्यवस्था पक व मसाज सेंटरचा मालक अशी दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विजय चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, राजू चंदनशिव, महेश गायकवाड, निलेश कदम, दत्तात्रय तांबे, रौफ इनामदार, शेखर मगर तसेच हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, उपनिरीक्षक राहुल एक वरोटे, शेंडगे, बाबर, देसाई, महिला पोलीस कोलते यांनी केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.