Kamshet News : कामशेत येथील नाणे रेल्वे गेट दुरुस्ती कारणास्तव दोन दिवस बंद, नागरिकांचे हाल

एमपीसी न्यूज :  कामशेत येथील नाणे रेल्वे गेट दुरुस्ती दुरुस्ती कारणास्तव दोन दिवस बंद आहे. बुधवारी (दि.२८) सकाळी १० वा. ते  गुरुवारी (दि.२९) सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.  

नाणे गेट मार्गावरुन नाणे मावळला जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. २० गावाचा हा मार्ग आहे. त्यातच मावळात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, रुग्णवाहिका जाण्या येण्यासाठी सुविधा नसल्याचे नाणे नानोली मार्गे कान्हे फाटा येथे जावे लागते. सुमारे १८ किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. यात रुग्णवाहिका चालकाला मार्ग माहीत नसल्याने त्या रुग्णाला मरण यातना सहन कराव्या लागत आहेत.

मावळ तालुक्यात कान्हे व नाणे गेट या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल मंजूर असून आद्यपही उड्डाणपूल तयार झाले नाहीत. कामशेत मावळ तालुक्याची बाजारपेठ असल्याने परिसरातील गावच्या ग्रामस्थांची वर्दळ असते. कोरोना काळात सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना त्यांच्या दुचाकी व चारचाकी नाणे रेल्वे गेटच्या परिसरात लावून जातात.

सलग दोन दिवस रेल्वे गेट बुधवार (दि.२८) सकाळी १० वा. ते गुरुवार (दि.२९) सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद असल्याने ग्रामस्थ गेट उघडण्याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत.

दरम्यान खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे उड्डाणपूल मंजूर आहेत, काही ठिकाणी  रेल्वे पुलांचे काम सुरूच आहे. शेलारवाडी, केशवनगर (वडगाव), जांभूळ, वाडीवळे आदि ठिकाणी काम सुरू आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.

रेल्वे भुयारी मार्ग पावसाळ्यात काही उपयोगाचे राहणार नसल्याचे नागरिक सांगत आहेत. मावळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडत असल्याने तळेगाव दाभाडे येथील हिंदमाता भुयारी मार्ग हा पावसाळ्यात स्विमिंग पूल होतो.

त्याच धर्तीवर रेल्वेचे भुयारी मार्ग असल्याने नागरिक विरोध करत आहेत. कान्हे व नाणे रेल्वे उड्डाणपूल रखडल्याने आंदर मावळ व नाणे मावळ भागाचा विकास रखडला आहे. केवळ शहरी भागाला रस्ते व पायाभूत सुविधा असून ग्रामीण भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिक सांगत आहेत.

या ठिकाणी दर दहा मिनिटाला रेल्वे गेट बंद असते,  त्यामुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत. सलग दोन दिवस रेल्वे गेट बंद असल्याने नागरिक व रुग्णवाहिका चालकांची गैरसोय होत आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध करुन रेल्वे गेट बंद करा पण वाहनचालक व नागरिकांची गैरसोय करु नका असे नागरिक बोलत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.