Narayangaon crime News : तोतया पोलिसाने वृद्धाचे अडीच तोळ्यांचे दागिने पळवले

तोतया पोलिसाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. : The fake police snatched the old man's two and a half weight jewelery

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करून तसेच लॉकडाऊन सुरु आहे, एवढे सोने घालून फिरू नका, असे म्हणत एका तोतया पोलिसाने वृद्ध नागरिकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने पळवून नेले. ही घटना बुधवारी (दि. 19) सकाळी दहा वाजता जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी येथे घडली.

सुभाष रायचंद कांकरिया (वय 71, रा. वारूळवाडी, ता. जुन्नर) यांनी याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती कांकरिया यांच्या घराजवळ आला.

त्याने मी पोलीस आहे.  ‘इथे शिंदे कोण आहे. त्याच्याजवळ गांजा पकडला आहे’ अशी कांकरिया यांना बतावणी केली. त्यावर कांकरिया यांनी ‘शिंदे कोठे राहतात, हे मला माहिती नाही’ असे सांगितले.

त्यानंतर ‘सध्या लॉकडाऊन सुरु आहे. तुम्ही हातात अंगठी व गळ्यात चेन घालून फिरू नका’ असे कांकरिया यांना सांगत त्यांचे सोने आरोपीने काढण्यास सांगितले.

एक तोळ्याची अंगठी आणि दीड तोळ्याची सोन्याची साखळी काढून रुमालात बांधून ठेवतो असे सांगून त्या तोतया पोलिसाने अंगठी आणि सोन्याची साखळी रुमालात न ठेवता स्वताकडे ठेऊन कांकरिया यांना बोलण्यात गुंतवून तोतया पोलीस पसार झाला.

पोलीस तिथून निघून गेल्यावर कांकरिया यांनी रुमाल पहिला असता त्यात त्यांना त्यांची अंगठी आणि चेन मिळाली नाही. याबाबत त्यांनी तोतया पोलिसाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.