BNR-HDR-TOP-Mobile

Narayangaon : मौजे मांजरवाडीत पूर्ववैमनस्यातून एकास पेट्रोल टाकून पेटवले; दोघांना अटक

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकाला त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून जीवे मारण्याचा प्रयन्त केल्याप्रकरणी दोघांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार जुन्नर तालुक्यातील मौजे मांजरवाडी गावच्या हद्दीत मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. यात रशिदभाई तांबोळी हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

याप्रकरणी शोएब रशिदभाई तांबोळी (वय २४, धंदा- नोकरी, रा. मांजरवाडी, तालुका- जुन्नर, जिल्हा पुणे) यांनी आज बुधवारी (दि. १५) पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार ऋषीकेश पोपट लोखंडे (रा. मांजरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) आणि किरण काणिफनाथ जाधव (रा. मांजरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी आरोपींची नावे असून त्यांना अटक केली आहे.

  • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ऋषीकेश पोपट लोखंडे आणि किरण काणिफनाथ जाधव हे मंगळवारी रात्री एकच्या सुमारास फिर्यादी याच्या राहात्या घराजवळील पानटपरीजवळ येऊन फिर्यादी याच्या वडिल रशिदभाई तांबोळी यांस जुन्या भांडणाचा राग मनात धरून फोन केला. तसेच त्यांच्याकडे सिगारेटची आणि माचिसची मागणी करून तुमचा मुलगा शोएब कोठे आहे? अशी चौकशी केली. याचवेळी या दोघांनी रशिदभाई तांबोळी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनी दिलेल्या माचिसने त्यांना पेटवून दिले.

यात रशिदभाई तांबोळी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.याबाबत जखमी रशिदभाई तांबोळी याचा मुलगा शोएब याने नारायणगाव पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषीकेश पोपट लोखंडे आणि किरण काणिफनाथ जाधव या दोघांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. तापसी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ए. के. घोडे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तसेच रुग्णालयात जखमीची भेट घेऊन घटना जाणून घेतली.

HB_POST_END_FTR-A4

.