Pimpri : पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे 

युवक संघटना मजबूत करणार - नरेंद्र बनसोडे

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नुकत्याच राज्यभरात निवडणुका पार पडल्या. त्यांचा निकाल नागपूर येथे मतमोजणी जाहीर करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे विजयी झाले. 

पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी संदेश बोर्डे यांची तर मयुर जैयस्वाल यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड कऱण्यात आली.

शहर कार्यकारणीनीवर उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, करण गील, अनिकेत अरकडे, कुंदन कसबे, डॉ. स्नेहस खोब्रागडे, विरेंद्र गायकवाड, रौनक तावडे, इब्राहिम चौधरी, गौरव चौधरी यांची सरचिटणीसपदी तर चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी सौरभ शिंदे यांची निवड झाली.

या विजयाबद्दल बोलताना नरेंद्र बनसोडे म्हणाले की, या पुढील काळात युवकांच्या समस्या मुख्यत्वे बेरोजगारी तसेच इतरही सामाजिक प्रश्न सोडवून त्यांना सक्षम करणार असून शहरामध्ये समतावादी युवकांचे संघटन युवक काँग्रेसच्या माध्यमांतून करणार आहे. लवकरच युवा जो़डो अभियान राबविणार असून युवा वर्ग युवक कॉंग्रेसची जोडून कॉंग्रेस संघटना बळकट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.