Pune : अजून १०-१५ वर्षे मोदींचीच हवा राहणार – रामदास आठवले

एमपीसी न्यूज : काँग्रेसचे नसीम खान यांनी काही दिवसांपूर्वी आठवले यांनी काँग्रेसबरोबर यावे असे आवाहन केले होते. त्याला प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात, मी हवा पाहून कोणाबरोबर जायचा याचा निर्णय घेतो असे वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ देत आठवले म्हणाले मी मला हवा कळते असे विधान केले होते, हे खरे आहे. मात्र, अजून १० ते १५ वर्षे मोदींचीच हवा राहणार आहे असेही म्हणलो होतो.

मात्र, माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. नरेंद्र मोदींची हवा सहजासहजी बदलणार नाही. मी जोपर्यंत नरेंद्र मोदींबरोबर आहे तोपर्यंत हवा बदलणार नाही. १०-१५ वर्षे मोदींची हवा झाल्यानंतर हवा कुठे आहे ते बघू असे मी म्हणालो होतो असेही त्यांनी सांगितले. ‘तारका फाऊंडेशन’च्या वतीने आशिष कांटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्यातील श्री महालक्ष्मी लॉन्स येथे त्यांच्या अभीष्टचिंतनाचा भव्य मेळावा आणि विशेष पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आठवले बोलत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.