Talegaon : भाजप युवा मोर्चाच्या खजिनदारपदी नरेंद्र टकले

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील भाजपाचे युवा कार्यकर्ते नरेंद्र दत्तात्रय टकले यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे खजिनदारपदी निवड करण्यात आली. 

मावळ तालुका भाजपाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप काकडे यांनी टकले यांची निवड जाहीर केली असून कामगार व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. टकले हे तळेगाव दाभाडे येथील कान्होबा मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष असून त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. आगामी काळात पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2