Nasa Fraud : नासामधील मौल्यवान धातूचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या निलंबीत पोलीस अधिकाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – लोक कोणत्या भूलथापांना बळी पडतील हे सांगणे खरंच कठीण आहे. कारण एका टोळीने चक्क अमेरिकेचे अंतराळ संशोधन केंद्र नासा येथून (Nasa Fraud) एक मौल्यवान धातूचे भांडे मिळवून देतो म्हणत 50 लाख रुपयांचा गंडा घताला. यात कहर म्हणजे या भांड्याच्या आमिषापोटी जमीनही विकण्यास भाग पाडली. अशी फसवणूक करणाऱ्या रेल्वे पोलिसांतील निलंबीत पोलीस अधिकारी रॉबर्ट उबोल्डो रोझीरीओ (रा. खडकी) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

त्याच्याबरोबर मेहुल गांधी व सतीष मुकेरकर व त्यांच्या तीन  महिला साथीदार सोनाली जाधव, पुजा गुरुड, संगिता नगरकर यांना पोलिसांनी अटक केले असून त्यांचे चार साथीदर अजूनही फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यात 2 जून रोजी एक तक्रार आली. त्यानुसार फिर्यादी यांना या टोळीने तुम्हाला शेअर मार्केटमधून जा स्त फायदा मिळवून देतो तसेच नासा येथून आर.पी. या मौल्यवान धातूचे भांडे विक्री करायचे आहे. त्यातून मी 500 रुपये कोटी रुपयांचा फायदा मिळवून देतो असे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपीटल ऑफ दिल्ली ई स्टॅम्पचे बनावट सर्टीफिकेट बनवून दिले. हे सर्टीफिकेट सोनाली जाधव हिने दिले. यावेळी त्यांनी बँक ऑफ बडोदाचे स्वाक्षरी केलेले तीन कोरे चेक दिले. याच भरोश्यावर फिर्यादी यांनी 37 लाख रुपये आर.टी.जीएसद्वारे तर 12 लाख रुपये रोख असे 49 लाख रुपये घेतले. यासाठी त्याने फिर्यादी यांना त्यांची पौड येथील शेत जमीनही कमी भावात विकण्यास भाग पाडली. फिर्यादी यांना संशय आल्यानंतर त्यांनी गुंतवणूक केलेले पैसे परत मागितले असता आरोपींनी त्यांना परतावा देणे तर सोडाच उलट जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हा गुन्हा आर्थिक व गुंतातुंतीचा असल्याने (Nasa Fraud) पोलिसांनी एक पथक बनवत याचा शोध सुरु केला. यातून पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी रॉबर्ट उबोल्डो रोझीरीओ हा सर्व प्लानचा मुख्य सुत्रधार होता. मात्र त्याला तांत्रिक ज्ञान असल्याने तो चलाखीने त्याच्या राहण्याचा जागा व मोबाईल क्रमांक बदलत होता. फसवणूकीसाठी त्याने वेगवेगळ्या साथीदारांचे सहाय्य घेतले. राईस पुलर (आर.पी) या नासातील भांड्याचे आमिष दाखवून त्याने राज्यात अनेकांना गंडा घातल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोणाची अशी फसवणूक झाली असेल किंवा काही माहिती असले, तर त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यकी पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ यांच्याशी 9850231960 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याचा कसून तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

PCMC Breaking News : महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची बदली; शेखर सिंह नवे आयुक्त

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.