Nashik Accident : ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांना मिळाला पुनर्जन्म; अपघातातून बचावले

शिवशाहीच्या अपघाताची मालिका सुरूच

एमपीसीन्यूज : नाशिक-मुंबई महामार्गावर (NH-3) ठाणे जिल्ह्यातील शहापूर पुलाजवळ शिवशाही बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याचा दुभाजकांचा कठडा तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनर व कारवर शिवशाही बसने धडक दिल्यामुळे झालेल्या तिहेरी अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची दोघांचा मृत्यू झाल्याची भीती पोलिसांनी वर्तवली आहे.

_MPC_DIR_MPU_II

या अपघातात नाशिकचे विशेष सरकारी वकील, ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांच्या कारचा चक्काचूर झाला असून सुदैवाने ते बचावले आहेत.

गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शहापूर पुलावर हा विचित्र अपघात झाला होता. अजय मिसर यांनी सीबीआयचे वकील म्हणून ही काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.