Nashik Corona News : शासकीयपेक्षा खासगी लॅबमध्ये कोरोना पाॅझिटिव्हचे आकडे जादा

जिल्हाधिकाऱ्यांकडून दातार जनेटिक्स लॅब सील करण्याचे आदेश

एमपीसीन्यूज : शासकीय कोरोना टेस्टिंग लॅबच्या अहवालापेक्षा खासगी लॅबमध्ये कोरोना पाॅझिटिव्हचे आकडे जादा दाखवल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दातार जनेटिक्स लॅब सील करण्याचे आदेश दिले आहेत.पुढील आदेश येईपर्यंत या लॅबमध्ये कोरोना स्वॅब टेस्टिंग करण्यास बंदी घातली आहे.

तसेच याप्रकरणी शहरातील सुप्रीम डायग्नोस्टिक व ठाण्यातील तुर्भे येथील थारोकेअर लॅबची तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक व महापालिका आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.

दरम्यान, या सर्व परिस्थितीमध्ये कंपनीने तुर्त कोविड १९ ची तपासणी बंद करण्याचा निर्णय दातार जेनेटिक्सकडून घेण्यात आला आहे. रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीबाबत दिलगीर असल्याचे एक पत्रक्र दातार जेनेटिक्सकडून जारी करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या पत्रानुसार, दातार जेनेटिक्सकडून (National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories (NABL) a Indian Council of Medical Research (ICMR) THITUTA कोविड 19 ची RT PCR चाचणी नाशिकमध्ये उपलब्ध आहे. चाचणी ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि योग्य ते किटस् वापरुन अत्यंत अचूकपणे केली जाते.

गेल्या काही दिवसात नाशिकमधील कोरोना प्रादुर्भावासंबंधात खासगी प्रयोगशाळांचे रिपोर्टस् अचूक आहेत किंवा कसे याबद्दल शंका उपस्थित करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.

आमच्या कंपनीमध्ये तपासलेल्या नमुन्यांपैकी काही नमुने हे NIV ( National Institute of Virology) आणि ICMR कडे पुर्नतपासणीसाठी नियमितपणे पाठविले जातात. आजपर्यंत झालेल्या सर्व पुर्नतपासण्या 100 टक्के बरोबर आहेत.

आम्ही या संबंधात प्रशासनास पत्र लिहून साठवून ठेवलेल्या नमुन्यांचे पुर्नपरिक्षण आमच्या खर्चाने NIV मार्फत करून घ्यावे, अशी विनंती केली असल्याचे दातार जेनेटिक्सच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.