Nashik Corona Update : जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 10 हजार 492 रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज मिळालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील 1 लाख 10 हजार 492 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1 हजार 307 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आतापर्यंत 2 हजार 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.

नाशिक ग्रामीण भागामध्ये नाशिक 66, चांदवड 25, सिन्नर 81, दिंडोरी 19, निफाड 55, देवळा 06, नांदगांव 27, येवला 20, त्र्यंबकेश्वर 13, सुरगाणा 01, पेठ 06, कळवण 10, बागलाण 18, इगतपुरी 03, मालेगांव ग्रामीण 16 असे एकूण 366 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 800, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 136 तर जिल्ह्याबाहेरील 05 असे एकूण 1 हजार 307 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 1 लाख 13 हजार 830 रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण भागामध्ये 96.50, टक्के, नाशिक शहरात 97.59 टक्के, मालेगाव मध्ये 93.35 टक्के तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 94.90 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.07 इतके आहे.

नाशिक ग्रामीण भागामध्ये 801 नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 1 हजार 04, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून 176 व जिल्हा बाहेरील 50 अशा एकूण 2 हजार 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लक्षणीय :

◼️1 लाख 13 हजार 830 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1 लाख 10 हजार 492 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 1 हजार 307 पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.07 टक्के.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.