Nashik Corona Update : जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 10 हजार 632 रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसीन्यूज : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज सकाळी अकरा वाजता प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 1 लाख 10 हजार 632 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 1 हजार328 रुग्णांवर उपचार सुरु असून, आत्तापर्यंत 2 हजार 32  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

सध्या उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 63, चांदवड 24, सिन्नर 81, दिंडोरी 22, निफाड 52, देवळा 7, नांदगांव 27, येवला 19, त्र्यंबकेश्वर 14, सुरगाणा 1, पेठ 7, कळवण 12, बागलाण 18, इगतपुरी 4, मालेगांव ग्रामीण 18, असे एकूण 369 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 819, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 133, तर जिल्ह्याबाहेरील 7, असे एकूण 1 हजार328  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 1 लाख 13  हजार 992 रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमधे 96.49, टक्के, नाशिक शहरात 97.56  टक्के, मालेगावमध्ये 93.42 टक्के, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 94.72  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.05 इतके आहे.

मृत्यू

नाशिक ग्रामीणमध्ये 801, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  1 हजार 5, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून 176 व जिल्हा बाहेरील 50 अशा एकूण 2  हजार 32  रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.