Nashik Crime News : देवळा येथील शेतातून 8 ते 10 क्विंटल लाल कांद्याची चोरी; कांदा उत्पादकांमध्ये काळजीचे वातावरण 

एमपीसी न्यूज – कांद्याच्या बाजारभावात थोडीशी सुधारणा होताच कांदा चोर पुन्हा सक्रिय झाले असून भिलवाड ता. देवळा येथील शेतकरी केशव पोपट जाधव यांच्या शेतातून 8 ते 10 क्विंटल लाल कांद्याची चोरी झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.

कांदा उत्पादक शेतकरी केशव जाधव यांनी काढणी केलेला 15 ते 20 किंटल लाल कांदा आपल्या शेतातच वरळी घालून ठेवला होता. कांद्याला कलर येईल व चांगल्या दराने कांदा विक्री होईल यासाठी जाधव यांनी पातीने कांदा झाकून ठेवलेला होता.

_MPC_DIR_MPU_II

त्यातच मंगळवार (दि.२) रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी त्यातील 8 ते 10 क्विंटल कांदा चोरून नेला. केशव जाधव यांचा मुलगा केशव यांनी लाल कांद्याचे महागडे रोप आणून कांद्याची लागवड केली होती.

गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजारभावात थोडी सुधारणा झाल्याने थोडाफार पैसा हातात येईल या आशेने मोठ्या कष्टाने कांदा तयार केला. त्यातच चोरट्यांनी डल्ला मारल्याने सचिन जाधव यांचे आजच्या बाजारभावाच्या हिशोबाने जवळजवळ 35 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याआधी तालुक्‍यात उन्हाळ कांदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा लाल कांद्याच्या बाजारभावात थोडीशी सुधारणा होताच कांदा चोर सक्रिय झाल्याने कांदा उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्ग करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.