Nashik Crime News : वाडीवऱ्हेमधील संशयास्पद मृत्यूप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज : वाडीवऱ्हे पोलिसांच्या हद्दीत संशयास्पद स्थितीत आढळुन आलेल्या युवकाच्या मृतदेहाप्रकरणी वणी येथील व्यापारी हसमुख चंदनमल बोथरा यास अटक करण्यात आली आहे. त्याला आज (दि.29) न्यायालयासमोर उभे केले असता त्याची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

वाडीवऱ्हे पोलिसांच्या हद्दीत गेल्या 23 जानेवारीला राकेश राजेंद्र निकम (वय 24, रा.आघार बु.चौफाटा ढवळेश्वर, ता. मालेगाव) याचा मृतदेह आढळला होता. गळ्यावरील खुणांवरून त्याचा खून झाल्याचा कयास पोलिसांनी बांधला होता. पोलिसांनी मृतदेहाचे फोटो जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांमध्ये पाठवल्यानंतर युवकाची ओळख पटून त्याचा मोबाईल नंबर मिळाला होता.

वाडीवऱ्हे पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळवली असता वणी येथील विद्युत वितरण उपकेंद्रामागील रोहाऊसमध्ये वास्तव्यास असलेल्या ठिकाणी राकेशचा मृत्यू झाल्याची माहिती हाती लागली. मृताच्या कॉल रेकॉर्डवरून पोलिसांनी स्लायडींग व्यापारी हसमुख चंदनमल बोथरा यास ताब्यात घेतले.

दरम्यान, मृत राकेश हाही स्लायडींगचे काम करीत होता. राकेशचा मृत्यू वणीत झाला, मृतदेह वाडीवऱ्हे येथे कसा आला याबाबत तपास केला असता खाजगी वाहनाने हा मृतदेह वाडीवऱ्हे पोलिसांच्या हद्दीत टाकून देण्यात आल्याची माहीती समोर आली.

वणी येथे चौकशीअंती मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना हसमुख बोथरा यास अटक करण्यात आली अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कशाने तरी गळा आवळून ठार मारले आहे. माझी अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार आहे अशी फिर्याद मृत राकेशचा भाऊ सागर राजेंद्र निकम (वय 29 रा.आघार बु.चौफाटा ठवळेश्वर,ता.मालेगाव) याने पोलिसात दिली आहे . याबाबात अधिक तपास वरिष्ट पोलिस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हे पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.