Nashik Crime News : जॉगिंग करणारी तरुणी घंटागाडी खाली सापडून ठार

एमपीसीन्यूज : नाशिकच्या सातपूर परिसरात घंटागाडी खाली सापडून एक तरुणी ठार झाली. सकाळी सातच्या सुमारास ग्लेन मार्क कंपनी समोर हा अपघात झाला.

रोशनी जैस्वाल, असे या तरुणीचे नाव आहे. रोशनी ही कामगार नगर, सातपूर परिसरात सकाळी जॉगिंगला गेली होती. तिचे आई वडील मुंबईला गेले असून तिला तीन बहिणी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अपघात घडला त्यावेळी रोशनी सकाळच्या थंडीत रनिंग करत होती, असे  स्थानिकांनी सांगितले. घंटागाडी चालकासह दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.