Nashik Crime News : नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; सात संशयित आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सात जणांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात संशयित आरोपींना अटक केली आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. सात आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुले आणि एका मुलीचाही समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.