Nashik Leopard Update: बिबट्याच्या हल्ल्यात नाशिकमध्ये दोनजण जखमी

Nashik Leopard Update: Two injured in leopard attack

एमपीसी न्यूज – नाशिकच्या इंदिरानगर भागात बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची घटना आज (शनिवारी) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. परिसरात बिबट्या झाल्याच्या घटनेने रहिवाशांमध्ये घाबरट निर्माण झाळी. नागरिकांनी आपली दारे खिडक्या बंद करून स्वतःला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. 

घटनेची माहिती रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर काही वेळेतच वन विभागाचे रेस्क्यू पथक व पोलीस घटनास्थळी पोहोचले. वन विभागाच्या पथकाकडून संपूर्ण परिसर पिंजून काढला जात आहे. राज सारथी सोसायटीमध्ये हा बिबट्या शिरला आहे.

जिन्यामध्ये बिबट्याने एका ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या जिन्याने खाली धूम ठोकली आणि सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावरून पुढे जात दुसऱ्या एका इसमावर हल्ला चढविला. हा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या प्रकारात एकजण गंभीर जखमी झाला असून दुसऱ्या इसमला किरकोळ जखम झाली आहे.

बिबट्या येथील दत्त मंदिरच्या दिशेने जाताना कॅमेऱ्यात दिसतो. मात्र तेथून पुढच्या कॅमेऱ्यात बिबटया कैद झाला नाही. यावरून बिबट्याने
सोसायटीच्या मागील बाजूने झेप घेत वाडाळ्याच्या दिशेने नाल्याकडे धूम ठोकली असावी, असा अंदाज वनविभागाच्या पथकाने व्यक्त केला
आहे. परिसरात बिबट्याच्या पाऊळखुणा ही आढळून आल्या आहेत.

या घटनेपूर्वी पहाटे 3 वाजेच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील एका रुग्णालयाच्या सुरक्षा राक्षकास बिबट्य़ा पळताना दिसला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.