Nashik News : नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; अल्ट्रा स्पाईस रेसमध्ये नाशिकच्या सायकवीरांना यश  

एमपीसी न्यूज – इन्स्पायर इंडिया आयोजित अतिशय खडतर व आव्हानात्मक अल्ट्रा स्पाईस रेस ही गोवा – कूर्ग – गोवा 1200 की .मी .ची नाशिक सायकलिस्टचे मेंबर लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू व विभव शिंदे यांनी जिंकली.

लेफ्टनन कर्नल भरत पन्नू, विभव शिंदे व डॉ. हिमांशु ठुसे यांनी 1200 किलोमीटर अन सपोर्टेड अल्ट्रा स्पाईस रेसचे आव्हान स्वीकारले. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 84 तास दिले जातात , खाणेपिणे व सायकलला आलेले प्रॉब्लेम हे सर्व स्वतः मॅनेज करावे लागते.

ही स्पर्धा लेफ्टनन कर्नल भरत पन्नू यांनी 76 तास 4 मिनिटांमध्ये पुर्ण केली. या स्पर्धेत सतत पाच वर्षांपासून ते विजयी ठरले.

विभव शिंदे यास गेल्या चार वर्षापासून सायकलिंगची गोडी निर्माण झाली, लॉकडाऊनच्या काळात होम ट्रेनरवर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली व प्रथमच अल्ट्रा स्पाईस या स्पर्धेचे आव्हान स्वीकारले व अतिशय खडतर अशी ही स्पर्धा 76 तास 43 मिनिटांमध्ये पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला.

डॉ. हिमांशु ठुसे हे देखील चांगल्या रीतीने लीड करत होते , दुसऱ्या कंट्रोल पॉइंट पास नंतर त्यांच्या गुडघेदुखीचा वेदनेमुळे वेग कमी झाला. सायकलमध्ये देखील बिघाड झाला या सर्व गोष्टींवर मात करून ही स्पर्धा पूर्ण करण्यात प्रयत्नशील ठरले .योध्या प्रमाणे वेळ संपून गेली तरी देखील स्पर्धा पूर्ण केली.

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे सर, कार्यकारिणी टीम व सर्व सायकलिंस्टनी या स्पर्धेचा अनुभव लाईव्ह ट्रॅकद्वारे अनुभवला व सायकलवीरांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.