Nashik News : पोलीस आयुक्तालय परिसरात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश

एमपीसी न्यूज – नाशिक शहर पोलीस आयुक्तालय परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 09 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये शस्त्र व आदेश जारी केला आहे.

या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 नुसार शिक्षेस पात्र राहील, असे विशेष शाखा पोलीस उपआयुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी शासकीय मनाई आदेशान्वये कळविले आहे.

तसेच नाशिक ग्रामीण‍ जिल्ह्यातही शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक ग्रामीण जिल्ह्यात (मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर यांची हद्द वगळून) पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यास मदत व्हावी 09 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. असे अपर जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी शासकीय मनाई आदेशान्वये कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.