Nashik News : स्थायी समिती सभापती पदी भाजपाच्या गणेश गिते यांची बिनविरोध

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपचे गणेश गिते यांची बिनविरोध निवड झाली असल्याची घोषणा पीठासन अधिकारी सुरज मांढरे यांनी केली.

स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी स्थायी समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पीठासन अधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.

सभापतीपदासाठी भाजपचे गणेश गीते यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले या निवडणुकीत शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असल्याने शिवसेनेचे कोणीही सभासद या बैठकीसाठी उपस्थित नव्हते राज्यात असलेल्या महाविकासआघाडी चा फॉर्मुला वापरण्याचे भाषा करण्यात येत असले तरी या निवडणूक प्रक्रियेसाठी काँग्रेसचे राहुल दिवे आणि राष्ट्रवादीच्या समीना मेमन हे सभागृहात उपस्थित होते.

भाजपचे हिमगौरी आडके, रंजना भानसी, माधुरी बोलकर, योगेश हिरे, गणेश गीते, मुकेश शहाणे, प्रतिभा पवार, शांताबाई नागरे, मनसेचे सलीम शेख उपस्थित होते.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.