Nashik News : बॉक्सर अंजली व श्रीहरी यांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्याचा सन 2020 चा क्रीडारत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज बॉक्सर अंजली मोरे व श्रीहरी मोरे या बंधू व भगिनीचे आज नाशिक येथील कार्यालयात सत्कार करून गौरव करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ तसेच मोरे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

बॉक्सिंग खेळाडू अंजली मोरे आणि श्रीहरी मोरे हे दोघेही विश्वविख्यात बॉक्सर मेरी कोम यांचेकडे गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले आहे. अंजली मोरे हिने आतापर्यंत 27 सुवर्णपदक तर श्रीहरी 25 सुवर्णपदक पटकावले असून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2020 सालचा क्रीडारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.