Nashik News: भ्रष्टाचाराविषयी तक्रारअर्ज आता Whats App वरही स्वीकारणार – जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज – कोविड-19 संसर्गामुळे नाशिक जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक झूम ॲपद्वारे ऑनलाईन  घेण्यात येणार असल्याने अर्जदरांनी आपले अर्ज जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे ई-मेल अथवा व्हॉट्सॲप प्रणालीद्वारे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येते.

ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या बैठकीसाठी अर्जदारांनी अर्ज सादर करतांना संपूर्ण नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक स्पष्ट नमुद करून आवश्यक पुरावे व कागदपत्रांसह अर्ज  PDF स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 9421954400 या व्हॉटस्ॲप ग्रीव्हीन्स क्रमांकवर पाठविण्यात यावा.

_MPC_DIR_MPU_II

सदर बैठकीचा  Id व Password जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शासकीय, अशासकीय सदस्य व अर्जदार यांना कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.