Nashik News : ‘कोविशिल्ड’ सुरक्षित; कोरोना लसीकरणाची मोहिम व्यापक करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : राधाकृष्ण गमे

एमपीसी न्यूज – कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी कोरोना लस सुरक्षित आहे. तसेच कोरोना लसीकरणाची मोहिम व्यापक करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुकत राधाकृष्ण गमे यांनी केले.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ‘कोविशिल्ड’ लस घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाची लस पुर्णत: सुरक्षित असून नागरिकांनी याबाबत कुठलीही भिती व गैरसमज करुन घेवू नये. तसेच नाशिक विभागात लसीकरणाची टक्केवारी समाधानकारक असल्याचेही, विभागीय आयुक्त गमे यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाचे सावट अजून कमी झाले नसल्याने प्रत्येक नागरिकाने आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी मास्क सॅनिटायझर व सुरक्षित अंतर या नियमाबरोबरंच कोरोना लसीकरण करुन घ्यावे. ‘माझे कुंटुब माझी जबाबदारी’ या सामाजिक जाणिवेतून समाजातील प्रत्येक नागरिकाने लसीकरणासाठी पुढे यावे. असे आवाहन गमे यांनी यावेळी केले.

कोरोना लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग अत्यंत सचोटी व प्रामाणिकपणे काम करत असल्याने गमे यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांचे कौतुक व समाधान व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like