Nashik News : कामकाज सुरु होण्यापूर्वीच नाशिक महापालिकेची महासभा तहकूब 

0

एमपीसी न्यूज – कामकाज सुरु होण्यापूर्वीच नाशिक महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आजची महासभा कामकाज सुरु होण्यापूर्वीच महापौर सतीश कुलकर्णी यांनी तहकूब करण्याची घोषणा केली.

महापालिकेची महासभा ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येणार असल्याचे नियोजित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर जे सदस्य सभागृहात येतील त्यांच्यासमवेत महासभा घेतली जाईल असे ठरविण्यात आले होते. दरम्यान, जवळपास २० नगरसेवक आज या महासभेला हजार झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

यानंतर महासभा सुरु होण्याची वेळ झाली. महापौरांनी सभागृहात प्रवेश केला आणि लगेचच नाशिक मनपा क्षेत्रात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आजची महासभा कुठलेही कामकाज न पार पडताच तहकूब करण्यात आल्याचे महापौर कुलकर्णी यांनी जाहीर केले.

सभागृहात चर्चा करण्यासाठी आलेल्या नगरसेवक आणि गटनेत्यांनी यावेळी नाराजी व्यक्त करत सभागृहातून काढता पाय घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.