Nashik News: पाकिस्तानच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर ‘त्याने’ पाठविले देवळाली कॅम्पमधील तोफखाना केंद्राचे फोटो आणि व्हिडिओ

नाशिकच्या देवळाली कॅम्प आर्टिलरी सेंटरमध्ये हेरगिरीच्या संशयावरुन एकाला अटक

एमपीसी न्यूज – नाशिकच्या देवळाली कॅम्प तोफखाना केंद्राच्या परिसरात हेरगिरी केल्याचा संशयावरुन एका युवकाला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर त्याने या आर्टिलरी सेंटरचे फोटो आणि व्हिडीओ पाठवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हेरगिरीच्या या प्रकरणामुळे नाशिक परिसरात खळबळ उडाली आहे.

संजीव कुमार (वय 21) असे अटक केलेल्या परप्रांतीय युवकाचं नाव आहे. संजीव कुमार मूळचा बिहारचा असून तो रोजंदारी मजूर आहे. लष्करी हद्दीतील सैनिकी हॉस्पिटल परिसरात एक महिन्यापासून तो काम करत होता. लष्करी जवानांनी तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो आढळून आले.

त्यानंतर अधिक तपास केला असता त्याने एका व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर फोटो पाठवले असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी या तरुणाविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.