Nashik News: लासलगाव ग्रामपालिकेवर होळकर-पाटील यांचाच झेंडा 

एमपीसी न्यूज  – संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी ग्रामविकास पॅनलने घवघवीत यश मिळवत परिवर्तन पॅनलला घरचा रस्ता दाखविला.

या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील यांच्या ग्रामविकास पॅनल दहा तर कल्याणराव पाटील, डी. के. जगताप, प्रकाश दायमा यांच्या परिवर्तन पॅनलचे सात उमेदवार निवडून आले.  प्रभाग क्रमांक पाच मध्ये संतोष पलोड व संदीप उगले यांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी पद्धतीने सोडत काढण्यात आली यात संतोष पलोड यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी करण्यात आली.

वार्ड क्रमांक 1 मधून चंद्रशेखर होळकर यांना 560, अश्विनी बर्डे 526, अमिता ब्रम्हेचा 530, वार्ड नंबर 2 मधून रोहित पाटील 1167, अमोल थोरे 1052, सायली पाटील 1048, वार्ड नंबर 3 मधून नानासाहेब पाटील यांना 1161, सुवर्णा जगताप 1262, वार्ड नंबर 4 मधून अफजल शेख 824,पुष्पा आहिरे 699, रेवती होळकर 745 वार्ड नंबर 5 संतोष पलोड 499, संगीता पाटील 688, योगिता पाटील 643,वार्ड नंबर 6, जयदत्त होळकर 896, रामनाथ शेजवळ 807, ज्योती निकम 739 मतांनी निवडून आले आहे.

चिठ्ठी सोडतीत संतोष पलोड विजयी

लासलगाव प्रभाग क्रमांक पाच मध्ये संतोष पलोड आणि संदीप उगले यांना प्रत्येकी 499 मते मिळाल्याने सोडत पद्धतीमध्ये संतोष पलोड यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी घोरपडे यांनी संतोष पलोड यांना विजयी घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.