Nashik News : औरंगाबाद आणि गुजरातेतील चार ‘तीर्थ’व्रतींकडून साडे तेरा लाखाचे अवैध मद्य जप्त

एमपीसी न्यूज – अवैध मद्य विक्री व वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबविण्यात आलेल्या धडक मोहिमे अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क खात्याचे आयुक्त कांतीलाल उमाप व संचालक उषा वर्मा व नाशिक विभागाचे विभागीय उप आयुक्त अर्जुन ओहोळ, नाशिक जिल्हा अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे व उपअधीक्षक पोकळे यांनी धडक कारवाई केली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मधुकर राख यांना मिळालेल्या बातमीनुसार, नाशिकच्या भरारी पथक क्र. 1 ने आज (शुक्रवार, दि . 18 डिसें.)  पहाटेच्या वेळेस त्र्यंबकेश्वर येथील हॉटेल छत्रपतीसमोर अंबोली फाटा शिवार या ठिकाणी लोरा कार एम. एच -15 सी.आर -5721 व सॅन्ट्रो कार जी. जे -05 सी. डी – 4956 मध्ये केवळ दादरा नगर हवेली या ठिकाणी विक्रीसाठी असलेले म्हणजेच महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले पुढील ब्रँडचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले.

1. सिग्नेचर व्हिस्कीच्या 750 मि.ली. क्षमतेच्या 58 बाटल्या
2. ब्लेंडर्स प्राईड व्हिस्कीच्या 48 बाटल्या
3. मॅकडॉवेल नं -1 व्हिस्कीच्या 180 मि.ली. क्षमतेच्या 576 बाटल्या
4. मॅकडॉवेल नं -1 व्हिस्कीच्या 750 मि.ली. क्षमतेच्या 12 बाटल्या
5. मॅजिक मोमेंट व्होडकाच्या 750 मि.ली. क्षमतेच्या 10 बाटल्या
6. रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 750 मि.ली. क्षमतेच्या 12 बाटल्या
7. ओल्ड मंक रमच्या 750 मि.ली. क्षमतेच्या 12 बाटल्या  दोन्ही वाहनामध्ये सापडल्या.

यावेळी विक्रम आगाजी साळुखे (वय 28 वर्षे, रा . प्लॉट नं – 62 भरतनगर औरंगाबाद ता.जि.औरंगाबाद), अशोक मच्छिंद्र दस्पुते (रा. आडगाव बु औरंगाबाद ता. जि. औरंगाबाद), भावेशभाई बटुकभाई परमार (वय 29 वर्षे रा. राजपुत सोसायटी जलाराम चौक वरतेज भावनगर गुजरात), चंद्रदीप एन परमार (रा. बालीया हनुमान चौक न्यु प्लॉट विस्तार वरतेज भावनगर, गुजरात) या चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वरील मद्यसाठा व त्याची अवैधप्रकारे वाहूक करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन्ही चारचाकी वाहन मिळून असा एकूण 13,53,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई भरारी पथक क्र.1 चे निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक अरुण सुत्रावे, जवान सर्वश्री. विलास कुवर, धनराज पवार,  शाम पानसरे, सुनिल पाटील व अनिता भांड यांच्या पथकाने केली असून वरील गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक राख व दुय्यम सुत्रावे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.