Nashik News : नाशिकमध्ये दीडशेहून अधिक प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांना कोरोनाची बाधा

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र पाेलीस अकादमी मधील   (एमपीए) 167 प्रशिक्षणार्थी पाेलीस उपनिरीक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. ‘एमपीए’मध्ये 775 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यात गोवा राज्यातील 12 प्रशिक्षणार्थीचाही समावेश आहे.एमपीएमध्ये नुकतीच नाशिक महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय पथकाच्या वतीने कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात 167  प्रशिक्षणार्थी कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आले.

बाधित प्रशिक्षणार्थीवर महापालिकेच्या सिटी सेंटर मॉल नजीक असलेल्या एका डोममध्ये, एका खासगी दवाखान्यात तसेच मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. यातील सर्वच प्रशिक्षणार्थीची प्रकृती उत्तम असून त्यांना विलगिकरण करून उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाचेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली.

या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण नेमकी कशी झाली, याबाबत निष्कर्ष निघालेला नाही. बांधकाम कामगार अथवा भाजीपाला सप्लायर, सफाई कामगार, कॅन्टीन कामगार या सुपरस्प्रेडर पासून संसर्ग होण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 पॉझिटीव्ह अपडेट्स : दुपारी  12 वाजेपर्यंत  

*उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 14 ने घट

*जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 3  हजार 625 रुग्ण कोरोनामुक्त 

*सद्यस्थितीत 2 हजार  596  रुग्णांवर उपचार सुरू

 नाशिक, दि.२४ डिसेंबर, २०२० 

जिल्हा सामान्य रुग्णालया मार्फत आज प्राप्त अहवाला नुसार जिल्ह्यातील 1 लाख 3 हजार 625 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 2 हजार 596 रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये 14 ने घट झाली आहे.

आत्तापर्यंत 1 हजार 928 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी दिली आहे.

 उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण 

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक 192, चांदवड 40, सिन्नर 172, दिंडोरी 92, निफाड 96, देवळा 31, नांदगांव 69, येवला 19, त्र्यंबकेश्वर 33, सुरगाणा 6, पेठ 0, कळवण 41, बागलाण 160, इगतपुरी 15, मालेगांव ग्रामीण 19 असे एकूण 985 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.’

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 1 हजार 460, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 144 तर जिल्ह्याबाहेरील 7 असे एकूण 2 हजार 596 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 1 लाख 8  हजार 149 रुग्ण आढळून आले आहेत.

 रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण94.54, टक्के, नाशिक शहरात 96.59 टक्के, मालेगाव मध्ये 92.95 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 94.44 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 95.82 इतके आहे.

 मृत्यू  

नाशिक ग्रामीण 745 नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 962, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून 174 व जिल्हा बाहेरील 47 अशा एकूण 1 हजार 928 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 लक्षणीय 

◼️ 1 लाख 8 हजार 149 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1 लाख 3 हजार 625 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 2 हजार 596 पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 95.82 टक्के.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.