Nashik News : मनसेत जोरदार ‘इनकमिंग’ धडाका, दोन दिवसांत दोन मोठे प्रवेश

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नाशिक मनसेतील सर्व वरिष्ठ नेते व मध्य विभाग अध्यक्ष नितीन साळवे, मनसे वाहतूक सेना शहराध्यक्ष निलेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसांत असंख्य कार्याकर्त्यानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

पक्षाच्या राजगड’ कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी दिली.

मनसेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या माधुरी गांगुर्डे, कामिनी गांगुर्डे, शोभा पंडित, गीता गांगुर्डे, जयश्री निकम, वंदना वारडे, उषा रोकडे, योगीता कांबळे, मनीषा साळवे, करण गांगुडे, अक्षय गांगुर्डे, ऋतुराज गांगुर्डे, मंगेश खरे, योगेश त्रिभुवन, विकी निकम, अर्जुन वाघमारे, विशाल शेजवळ, सिद्धांत पगारे, किरण भालेराव, अनिल खरे, बबलु कालेकर, सागर पारे, किशोर पाळदे, दर्शन कांबळे, निलेश कानडे, बंटी शेजवळ, अक्षय मळसाळे, शुभम नागरे, कपिल बर्वे, विशाल आहिरे, सुमित कटारे, शेखर पाटोळे, संतोष पगारे, किशोर साळवे आदि प्रमुख कार्यकर्ते व समर्थकांचा समावेश होता.

या वेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांच्या हस्ते माधुरी गांगुर्डे व नुकतेच मनसेत प्रवेश घेतलेल्या ॲड. अभिजित बगदे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दातीर, ज्येष्ठ नगरसेवक सलिम शेख, गटनेत्या नंदिनी बोडके, विभाग अध्यक्ष नितीन साळवे, भाऊसाहेब निमसे, मनोज घोडके, सचिन भोसले, संतोष कोरडे, संजय देवरे, अमित गांगुर्डे, हरीश गुप्ता, धीरज भोसले, खंडूभाऊ बोडके, महिला सेनेच्या सुजाता डेरे, पद्मिनि वारे, अरुणा पाटील, मुक्ता इंगळे, आरती खिराडकर, उज्ज्वला थूल, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, किशोर वडजे, ॲड. अभिजित बगदे, निलेश सहाणे, गोपी पगार, अक्षय कोंबडे, सौरभ सोनवणे, शाहबाझ काजी, धर्मराज राऊत, स्वप्निल शहाणे, सागर पाटील, सिद्धांत भोळे, महेश पवार, संजय रासकर, कृष्णा नागरे आदि पदाधिकारी व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.