Nashik News : आंतरराष्ट्रीय गणिततज्ज्ञ दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे हृदयविकाराने निधन

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय गणिततज्ज्ञ दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर (वय 70) यांचे नाशिक येथे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.  त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

गोटखिंडीकर सरांचा परिचय –
# भास्कराचार्य गणितनागरीच्या उभारणीमध्ये एक संयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे

# मराठी भाषा संचालनालय सदस्य म्हणून कार्यरत आहेत

# मराठी विश्वकोष निर्मिती मंडळात भौतिक शास्त्र व गणित विषयाच्या कार्यात सहभागी .

# 9 व्या मराठी विश्व साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने कंबोडिया मध्ये मंदिर वास्तू रचना शास्त्र या विषयावर व्याख्यान .

# 2013 ते 2018 या काळात आयडीया वास्तुरचना शास्त्र महाविद्यालयात अध्यापन कार्य.

# यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम’ समितीचा सदस्य म्हणून नियुक्ती.

# अशोका एज्युकेशन फाउंडेशनचा संस्थापक CEO.

# वनवासी क्षेत्रातील शैक्षणिक व सामाजिक कार्यात ( सपत्नीक ) एकल विद्यालय अभियान योजनेत सक्रीय सहभाग.

# या काळात त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले
( 1 ) जीवन गौरवपुरस्कार- देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था ( 2 ) दीपस्तंभ पुरस्कार शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण संस्था ( 3 ) Invited Speaker award – association of mathematics teachers of India ( 4 ) Distinguished teacher award – Association for International Mathematics Education and Research ( 5 ) मराठी विज्ञान परिषद -सन्मानपत्र ( 6 ) अतिथी व्याख्याता 9 वे मराठी भाषा विश्व संमेलन , कंबोडिया आणि अनेक स्थानिक सन्मान व पुरस्कार

प्रा . दिलीप गोटखिंडीकर पेठे विद्यालयातून ( दि . 31 मे 2020 रोजी ) सेवानिवृत्त झाले होते. नाशिकच्या अशोका समूहाच्या गणित लॅब च्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता.

अनेकांना सेवानिवृत्ती नंतर काय ? असा प्रश्न असतो . त्यांनी केलेल्या कामांची यादी पाहून मन अचंबित होते.

_MPC_DIR_MPU_II

# सेवानिवृत्ती नंतर एकूण 37 देशांमध्ये सपत्नीक प्रवास केला होता.

# एकूण 7 आंतरराष्ट्रीय गणित परिषदांमध्ये शोध निबंध सादर केले.

# एकूण 73 पुस्तके प्रकाशित झाली.

# आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर ‘सफारनामा गणिताचा’ ही 26 भागांची मालिका निर्माण केली.

# आकाशवाणी नाशिक केंद्राच्या ‘विज्ञान कट्टा’ कार्यक्रमात 40 व्याख्याने.

# महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वैदिक गणित या विषयाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रत्यक्ष अध्यापन कार्य

# स्थानिक वृत्तपत्रांमध्ये नियमित स्तंभ लेखन .

# पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या ‘एकता’ या मासिकात 53 लेखांची गणिताची वाटचाल ही लेखमाला लिहिली .

# सन 2011 पासून आजपर्यंत ‘गणित : छंद – आनंद’ या गणित नियतकालिकाचा संपादक म्हणून कार्यरत आहेत .

# भारतातील सर्व राज्यांमध्ये प्रवास केला.

# 18 राष्ट्रीय पातळीवरील संमेलनांमध्ये भाषणे करण्याची संधी मिळाली .

आंतरराष्ट्रीय गणिती, पेठे विद्यालयाचे नामवंत गणित शिक्षक, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे माजी पदाधिकारी दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर सर यांच्या निधनाबद्दल नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत राहाळकर आणि उपाध्यक्ष प्रा दिलीप फडके यांनी थोर गणिततज्ज्ञाला आपण मुकलो असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like