Nashik News: इगतपुरीमध्ये झोपडीत बिबट्याने दिला चार बछड्यांना जन्म, पाहा VIDEO

Nashik News: Leopard gives birth to four cubs in a hut in Igatpuri पुन्हा शेतीच्या कामाकरिता घरात सामान घेण्यासाठी गेले असता त्यांना घरात चार बिबट्याचे बछडे दिसून आले. त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली.

एमपीसी न्यूज- इगतपुरी तालुक्यातील (जि. नाशिक) नांदगावसदो येथे एका शेतातील झोपडीत मादी बिबट्याने 4 पिल्लांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे बिबट्याचे चारही पिल्ले सुदृढ आणि सुरक्षित आहेत. या घरात सीसीटीव्ही लावून वनरक्षकाचीही नेमणूक करण्यात आली आहे.

शेतकरी राजेंद्र तांदळे यांनी आपल्या शेतात एक झोपडी बनवली आहे. शेतीची कामे आटोपून गावातील घरात ते राहतात. दि.15 रोजी तांदळे शेती कामाचे अवजार साहित्य घेण्यासाठी शेतातील झोपडीत आले असता त्यांना काही अंतरावर बिबट्या दिसून आला. त्यांनी त्वरीत वनविभागाला कळविले.


रविवारी दि. 16 रोजी सकाळी पुन्हा शेतीच्या कामाकरिता घरात सामान घेण्यासाठी गेले असता त्यांना घरात चार बिबट्याचे बछडे दिसून आले. त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली.

वनविभाग अधिकारीसह पथक घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी करीत घरात बछडे दिसून आल्यावर त्यांनी या परिसरात तात्काळ वनरक्षकांचा बंदोबस्त तैनात केला आणि कॅमेरा लावला. दरम्यान, मंगळवारी रात्री या ठिकाणी मादीने आपल्या बछड्यांकडे धाव घेतली. बराच वेळ थांबून बछड्यांचे निरीक्षण करून त्यांना दूध पाजले व पुन्हा जंगलात निघून गेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.