Nashik News : एकीकडे कर्ज दुसरीकडे खरेदी; सत्ताधाऱ्यांकडून यांत्रिकी झाडू खरेदीचा घाट

एमपीसी न्यूज – एकीकडे शहरात विकासकामांसाठी निधी नसल्याने कर्ज काढण्याची तयारी होत असताना दुसरीकडे यांत्रिकी झाडू खरेदी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. या अनोख्या यांत्रिकी झाडूची पाहणी करण्यासाठी देशात स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम आलेल्या इंदूर शहरात झाडूची पाहणी करण्यासाठी दौऱ्याचे नियोजन केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

केंद्र सरकारकडून महापालिकेला वीस कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यातून यांत्रिकी झाडू खरेदीचे वेध पालिका प्रशासनाला लागले आहेत.

प्रशासनाने बांधकामांचा मलबा उचलण्यासाठी स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था केली आहे तर ज्या ठिकाणी मलबा आढळून येईल तेथे संबंधित व्यक्तीला आठपट दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेत गेल्या वर्षी महापालिकेचा देशात अकरावा, तर राज्यात नवी मुंबई पाठोपाठ दुसरा क्रमांक आला. पहिल्या दहा शहरांमध्ये महापालिकेचा क्रमांक न येण्यामागे बांधकामाचा मलबा व घुळीचे लोट कारणीभूत ठरले असता त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

_MPC_DIR_MPU_II

स्वच्छतेसाठी इतर उपाययोजना करणे अपेक्षित असताना प्रशासनासह सत्ताधारी भाजपला यांत्रिकी झाडूचे वेध लागले आहेत . महापालिकेचे सुमारे एक हजार 750, खासगी मक्तेदाराचे सातशे कर्मचारी स्वच्छतेसाठी झाडू खरेदीच्या नियोजनाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

हवा गुणवत्ता सुधार निधीचा अपव्यय
केंद्र सरकारने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नाशिक महापालिकेला वीस कोटींचा निधी देऊ केला आहे. या निधीतून यापूर्वीच वाहतुक बेटे सुधारणे रस्त्यांची सुधारणा, हवामापक यंत्रे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने निधी खर्च करताना नियम व अटी घालून दिल्या आहेत, असे असताना यांत्रिक झाडू खरेदी करण्यासाठी प्रयत्न होत असल्याने फक्त खर्चावरच भर दिला जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पहिल्या वर्षी एक यांत्रिक झाडू भाडेतत्त्वावर घेऊन उपयोगिता तपासली जाणार होती; परंतु, अचानक तीन यांत्रिकी झाइ खरेदीसाठी प्रयत्न होत आहेत.

इंदूर शहरात यांत्रिकी झाडूचे काम कशा पद्धतीने सुरू आहे. त्याची उपयोगिता आहे की नाही, यासाठी पाहणीदौरा आहे. दौरा झाला म्हणजे लगेचच झाडू खरेदी करायचा नाही. गरज भासल्यास भाडेतत्वावर झाडू घेतला जाईल. तूर्त खरेदीचा कुठलाच विषय नाही.
– सतीश कुलकर्णी, महापौर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.