Nashik News: ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीला दणदणीत यश

एमपीसी न्यूज – नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीने 387 जागांवर विजय मिळवीत दणदणीत विजय संपादन केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सर्वाधिक म्हणजे 175 जागांवर विजयी झाले असून त्या खालोखाल शिवसेनेने 157 जागांवर बाजी मारली आहे. भाजपला मात्र 109 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 

नाशिक जिल्ह्यात 621 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यातील उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द झाली होती.  ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्षनिहाय विजयी उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

राष्ट्रवादी – 164 + 11 = 175

काँग्रेस – 50 + 5 = 55

शिवसेना – 143 + 14  = 157

भाजप – 109 + 7 = 116

माकप – 8

इतर – 98 + 11 = 109

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.