Nashik News : मराठी साहित्य संमेलनात यंदा पाहुण्यांची सरबराई; तब्बल 39 समित्यांची स्थापना

आयोजनात शिस्तपालन आणि तक्रार निवारण समितीचा समावेश

एमपीसीन्यूज : 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे संपन्न होत आहे. या संमेलनात राज्याबरोबरच देश विदेशातून साहित्यिक व मराठीवर प्रेम करणारे मान्यवर येणार आहेत. पाहुण्यांच्या सरबराईत कुठेही कमतरता राहू नये, यासाठी शिस्तपालन आणि तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांनी आपल्या आवडीनुसार ज्या समितीत काम करण्याची इच्छा आहे त्या समितीच्या उल्लेखासह आपले नाव, मोबाईल नंबर, वॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि ई-मेल पाठविण्याचे आवाहन संमेलनाचे आयोजक लोकहितवादी मंडळ, नाशिक यांच्यावतीने करण्यात आले आहे.

मराठी साहित्य संमेलनासाठी तब्बल 39 समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये 1) सल्लागार मंडळ (मार्गदर्शन समिती), 2) पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य 3), संयोजन व नियोजन समिती, 4) स्वागत समिती, 5) सत्कार समिती, 6) अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व अतिथी समिती, 7) मदत कक्ष समिती, 8) निधी संकलन समिती, 9) कार्यालयीन कामकाज व विविध शासकीय परवानगी समिती, 10) लेखा व लेखा परीक्षण समिती, 11) उद्घाटन व समारोप समिती, 12) कार्यक्रम समिती-अ (काव्य वाचन व स्वागत), 13) कार्यक्रम समिती-ब (परिसंवाद), 14) बालकुमार मेळावा समिती, 15) बोलीभाषा कवीकट्टा समिती/कवीकट्टा समिती, 16) गझल कट्टा समिती, 17) सांस्कृतिक कार्यक्रम समिती, 18) मंडप/व्यासपीठ/प्रवेशद्वार दालन उभारणी समिती, 19) सभा मंडप समिती (व्यासपीठ सजावट/बैठक व्यवस्था), 20) ध्वनी यंत्रणा व प्रकाश योजना समिती, 21) भोजन, अल्पोपहार समिती, 22) स्वच्छता, पाणी पुरवठा व विद्युत व्यवस्था समिती, 23) निवास व्यवस्था समिती, 24) ग्रंथ प्रदर्शन व अन्य प्रदर्शने समिती, 25) साहित्य प्रकाशन समिती (ग्रंथ प्रकाशन), 26) परिवहन (वाहतूक) व्यवस्था समिती, 27) पार्किंग समिती, 28) स्वयंसेवक निवड, देखरेख व कार्यशाळा समिती, 29) सुरक्षा व्यवस्था समिती, 30) प्रसिद्धी व माध्यम नियोजन (जनसंपर्क) समिती, 31) स्मरणिका, संपादकीय व जाहिरात समिती, 32) सोशल मिडीया, डिजीटल मार्केटींग समिती (वेबसाईटसह), 33) छायाचित्रण, ध्वनीमुद्रण, व्हिडीओ शुटींग समिती, 34) मुद्रण (छपाई) समिती : सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ओळखपत्र, बिल्ले, फलक (बॅनर्स व बॅचेस) 35) शहर सुशोभीकरण समिती, 36) ग्रंथदिंडी समिती 37) वैद्यकीय मदत समिती (आरोग्य), 38) विधी, शिस्तपालन, चौकशी व तक्रार निवारण समिती, 39) आपत्तकालीन नियोजन समिती (डिझास्टर मॅनेजमेंट), आदी समित्यांचा समावेश आहे.

या समित्यांमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या स्वयंसेवकांनी सुभाष पाटील -9822830464, किरण समेळ – 9422256041, सुनील भुरे- 9850970114 यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.