Nashik News: सोमवारपासून सुरू होणार नाशिक-बेळगाव विमानसेवा

अवघ्या 1,999 रुपयांत नाशिक ते बेळगाव प्रवास, तोही फक्त तासाभारात!

एमपीसी न्यूज – नाशिकमधून आणखी एक कंपनी विमानसेवा देण्यासाठी उत्सुक झाली आहे.  येत्या सोमवारपासून (25 जानेवारी) नाशिक ते बेळगाव विमानसेवा सुरु होणार असून अवघ्या 1,999 रुपयांत नाशिक ते बेळगाव फक्त तासाभरात गाठता येणे शक्य होणार आहे.

नाशिकहून आठवड्यातून तीन दिवस ही सेवा सुरु करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये सोमवार, शुक्रवार आणि रविवारी ही सेवा सुरु राहील.

कंपनीला दोन वर्षे पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर बम्पर सवलत कंपनीकडून देण्यात आली असून यामध्ये आजपासून पुढील पाच दिवस म्हणून 25 जानेवारीपर्यंत तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना अवघ्या 1,202 रुपयांत नाशिक ते बेळगाव प्रवास करता येईल.

एक फेब्रुवारीपासून हे प्रवासी 25 फेब्रुवारीपर्यंत वरील बुकिंगवर प्रवास करू शकणार आहेत. या विमानसेवेमुळे नाशिक जिल्हा आणि नाशिकचा महत्वाचा भाग हा उत्तर कर्नाटकशी जोडला जाईल. यामुळे कर्नाटकातील महत्वाच्या चार जिल्ह्यांना नाशिक जोडले जाणार आहे.

तसेच गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना बेळगावमार्गे अवघ्या चार ते पाच तासांत नाशिकहून गोव्याला पोहोचणे शक्य होणार आहे. बेळगाव ते गोवा 104 किमी अंतर तीन तासांच्या अंतरात पार करता येते, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.