Nashik News : नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन पाळणार एकदिवसीय संप

जीएसटी, ई-वे बिल व डिझेल दरवाढी विरोधात पुकारलेल्या एकदिवसीय संपाला नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – वस्तू व सेवा करांतील (जीएसटी) त्रुटी , ई – वे बिलातील जाचक अटी, डिझेल दरवाढ याविरोधात अखिल भारतीय व्यापारी महासंघाने ( कॅट ) 26 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या एकदिवसीय संपात सहभागी होऊन जीएसटी, ई-वे बिल व डिझेल दरवाढी विरोधात पुकारलेल्या एकदिवसीय संपाला नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा पाठिंबा नोंदविणार असल्याची माहिती नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

‘कॅट’ ही देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना आहे . देशातील 20 हजार व्यापारी संघटनांचे पाच कोटींहून अधिक व्यापारी या संघटनेचे सदस्य आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात जवळपास साडे तीन लाख सदस्य या संघटनेशी संलग्न आहेत. त्यामध्ये व्यापारी संघटनांसह घाऊक व किरकोळव्यापाऱ्यांचा समावेश आहे. ‘ ई – वे बील हे सध्या व्यापाऱ्यांसाठी व वाहतूकदार यांच्यासाठी सर्वाधिक अडचणीचे ठरत आहे. जीएसटी अधिकारी याद्वारे व्यापाऱ्यांची पिळवणूक करतात.

जीएसटी संकेतस्थळात अनेक त्रुटी आहेत. तसेच डिझेल दरवाढीमुळे मोठा फटका बसत आहे.या सगळ्याला विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे . या संपला नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्टच्या वतीने पाठिंबा देण्यात येत असून उद्या एकदिवसीय संपात सर्व वाहतूकदार सहभागी होणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.